गोचर गुरू वृश्चिक 2018

गोचर गुरू वृश्चिक 2018

गुरू दर 13 महिन्याने एका राशीचे गोचर भ्रमण पूर्ण करतो आणि आपल्या पैकी प्रत्येकाला ह्या गोचर गुरू चे आपल्या राशी वर काय परिणाम होतील हे जाणून घायची उत्सुकता असते. गुरू ह्या वर्षी 11 अक्टोबर 2018 रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ह्या लेखात आपण गोचर गुरू वृश्चिक 2018 चे 12 राशी वर काय परिणाम होतील ते जाणून घेणार आहोत.

गुरू हा ग्रॅहामालिकेतील सगळ्यात शुभ आणि महत्वाचा ग्रह मानला जातो. गुरू म्हणजे अंधारा कडून प्रकाशा कडे नेणारा. (गु) अंधार (रु) प्रकाश. गुरू हा उत्तम मार्गदर्शक आहे, उत्तम सल्लागार आहे, त्याचे आशिर्वादाने दिशा मिळते, मार्ग सापडतो, यश मिळते. गुरू ग्रहा मधे प्रचंड सकारात्मक उर्जा आहे. त्याची ज्या स्थानावर किव्हा ग्रहावर दृस्टी पडते त्याचे शुभ फळ देण्याची क्षमता वाढते. गुरू हा ज्ञानाचा कारक आहे, संतती चा कारक आहे, अध्यात्मचा कारक आहे.
पत्रिकेत गुरू बलवान असता सकारात्मक व्यक्तिमत्वा असते, सद्सद्विवेक बुद्धी, अध्यात्मची आवड, गुरू ब्राह्मणविषयी आदर, धार्मिक वृत्ती, लहान वयात जबाबदारी ची जाणीव, उत्तम लोकप्रियता वगैरे ह्या गोष्टी आदळतात.
गुरू पत्रिकेत कमकुवत असता माणूस तिकीटा वाचून निघालेला प्रवासी सारखा असतो, म्हणजे त्याला मार्ग सापडत नाही, बर्‍याच अंशी आयुष्यात काय कराव ह्याची जाणीव नसते, कन्फ्यूज़्ड असतात. जबाबदारी ची जाणीव नसते. अंगी मेचुरिटी नसते.

असा हा गुरू ग्रह आता वृस्चिक राशीत प्रवेश करणार आहे, मेष पासून मीन राशी ला हा गुरू काय फळ देईल ह्या बद्दल आता जाणून घेऊ.

गुरू गोचर वृश्चिक 2018 मेष राशी साठी

तुमच्या अष्टम स्थानात गुरू चा प्रवेश होत आहे, खूप शुभफळ देणारे हे गोचर नाही तरी गुरू ची चतुर्थ स्थानावर, व्ययस्थानावर आणि धनस्थान ह्यावर शुभ दृष्टी पडत आहे त्यामुळे काही अंशी शुभ फळ मिळेल.

धन वृद्धी होईल, परदेश प्रवास होण्याचे योग आहेत, नवीन घर, जमीन घ्यायचे किव्हा ट्रान्स्फर चे योग आहेत.

वारसा हक्काने लाभ होऊ शकतो, राहू तुमच्या चतुर्थ स्थानात गोचर भ्रमण करीत आहे, त्याची अशुभ फळ कमी होतील, घरात वातावरण शांत होईल, आईला आराम मिळेल.
खर्चा वर नियंत्रण ठेवा, आर्थिक बाबतीत लाभ दिसत असले तरी आर्थिक नियोजन करा. आर्थिक चढ उतार संभवतात.

हे गोचर अध्यात्मिक प्रगतीला उत्तम असेल, गूढ विषयाशी संबंधित असलेल्या लोकांसाठी उत्तम वर्ष आहे.

विध्यार्ती वर्गाला ह्या वर्षी गुरूबल नाही त्यामुळे जास्त परिश्रम घ्यावे लागतील. अभ्यासा कडे दुर्लक्ष करू नये.

उपाय : गुळ, धोतर-शल्य, यथाशक्ति दक्षिणा ब्राह्महणाला अर्पण करा. नित्या विष्णू सहस्रनामावली म्हणा.

गुरू गोचर वृश्चिक 2018 वृषभ राशी साठी

ह्यावर्षी गुरू चे गोचर भ्रमण तुमच्या सप्तम्स्थनतुन होत आहे. विवाह योग जुळून येईल, आर्थिक लाभ होतील, मित्र मंडळी कडून फायदा होण्याचे संभवते, लहान प्रवास फायदेशीर ठरतील.
शनि च् अष्टम स्थानी गोचर हे ह्या राशी ला विशेष फायदेशीर नाही. व्यवसाय नोकरीत बदल संभवतात, चढ उतार अष्टम शनि असे पर्यंत अनुभवाला येतील.
गोचर राहू कुटुंब स्थानी 2019 मार्च नंतर प्रवेश करील, आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहावे, परिवारासाठी वेळ काढा, खर्च वाढण्याची शक्यता आहे, बोलताना सांभाळून बोला कोणी दुखावला जाउ शकतो, संबंध बिगडू शकतात.
विद्यार्थी वर्गाला खूप मेहनत घ्यावी लागेल, शनि ची पंचम स्थानावर दृष्टी असल्यामुळे कष्ट करावे लागणार आहेत.
साधारण गोचर असणार आहे, इतर ग्रह प्रतिकूल असल्यामुळे गुरू चे विशेष फळ दिसणार नाही.

गुरू गोचर वृश्चिक 2018 मिथुन राशी साठी

ह्या वर्षी गुरू आपल्या शष्ठ स्थानी प्रवेश करीत आहे, खाण्यावर नियंत्रण ठेवा, अती आणि नको ते खाल्याने पोट बिघडू शकते, गॅस्ट्रिक आजार संभवतात.
गुरू ची दृष्टी दशम स्थान, व्ययस्थान आणि धनस्थानावर पडणार आहे जेणेकरून येणार्‍या वर्षात अनेकाना नोकरी, व्यवसायात उत्तम प्रगती होताना दिसेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल, लाभ होतील, धनस्थानी राहू चा गोचर भ्रमण गुरू च्या दृष्टी मुळे सौम्य होईल, घरच्या आणि आर्थिक कटकटी मधून दिलासा मिळेल.
व्यवस्थानी गुरूची दृष्टी शुभ कार्यात पैसा खर्चा होईल, परदेश प्रवासाचे योग येतील, नवेंबर 2018 नंतर परिस्थिती मधे सकारात्मक बदल होतील. मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल आणि वैवाहिक वा कौटुंबिक त्रासातून मुख्तता होईल.

2019 मार्च नंतर केतू चा सप्तं स्थानी प्रवेश होईल, त्या पुढील 1 दीड वर्ष वैवाहिक आयुष्यात गैरसमज होऊन त्रास होऊ शकतो, काळजी घ्यावी. जोडीदाराच्या आरोग्याची पण काळजी घ्यावी. विवाह जुळावताना फार काळजी घ्यावी, फसवणूक होऊ शकते, पुढील दीड वर्ष विवाह साठी चांगला काळ नाही.
विद्यार्थी वर्गाला साधारण काळ आहे.

उपाय : टिळाच्या तेलाचे दान करावे, शनिवारी शनि मंदिरात टिळाच्या तेलाचा दिवा लावावा. गुरुवारी गुळ, धोतर-शल्य, यथाशक्ति दक्षिणा ब्राह्महणाला द्यावी.

गुरू गोचर वृश्चिक 2018 कर्क राशी साठी

ह्या वर्षी गुरू आपल्या पंचम स्थानात प्रवेश करीत आहे, उत्तम गोचर आहे. भाग्यवृद्धी होईल, आरोग्य सुधारेल, लाभ होतील.

आपल्या पैकी बर्‍याच लोकांचा भग्योदय होण्याचे योग हा गुरू घेऊन येत आहे. मित्र परिवारा कडून लाभ होतील. मागच्या वर्षी केलेल्या एखाद्या कामाचा फायदा ह्या वर्षी होऊ शकतो. उपासना उत्तम घडेल, विद्यार्थ्यांना उत्तम काळ आहे.

शनि सहाव्या स्थानी असल्या मुळे तब्येत जपावी, राहू लग्न स्थानी आहे तो मार्च 2019 नंतर बारावे स्थानी जाईल, खर्च वाढतील, पण लगनातील राहू गेल्या मुळे पिडा कमी होईल. वैवाहिक आयुष्य मार्च 2019 नंतर सुधारेल. तो पर्यंत टोकाची भूमिका घेणे टाळा.

उपाय: शनि उपसाना करा, शनिवार तिलाच्या तेलाचा दिवा लावा. दशरथ कृत शनि स्तोत्र रोज म्हणा.

गुरू गोचर वृश्चिक 2018 सिंह राशी साठी.

गुरू तुमच्या राशी च्या चतुर्थ स्थानी प्रवेश करीत आहे. 12व्या राहू वर त्याची दृस्टी बराच दिलासा देणारी ठरेल. खर्चा वर नियंत्रण येईल. चांगल्या कामात पैसा खर्च होईल.

नोकरी व्यवसायात काही चांगले बदल घडतील, ट्रान्स्फर किव्हा प्रमोशन होण्याचे योग आहेत. बर्‍याच मंडळी ना ऑनसाइट विज़िट ची संधी मिळू शकते. परदेश प्रवासाचे योग आहेत.

शनि पंचम स्थानी असल्या मुळे निर्णय घेताना वेळ लागेल. आर्थिक नियोजन करून ठेवा, शनि ची लाभ आणि धनस्थानांवर दृस्टी आहे, त्यामुळे पैसयाची कमी जाणवू शकते. नीट नियोजन करा. परिवारा बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा, एकत्र फिरायचे बेत करा.

विद्यार्थी वर्गाला हे वर्ष जरा जास्त मेहनत करावी लागेल, पंचमात शनि मंदबुद्धी देतो. जास्त अभ्यास करा.

गुरू मुळे वारसा लाभू शकतो, अध्यात्मिक प्रगती साठी हे गोचर उत्तम आहे. एखादी प्रॉपर्टी किव्हा गाडी खरेदी करायला चांगली वेळ आहे.

उपाय: ब्राह्महणाला पिवळे धोतर शल्य दान करा. गाय दान उत्तम.

गुरू गोचर वृश्चिक 2018 कन्या राशी साठी

तुमच्या तृतीया स्थानात गोचर गुरू चा प्रवेश होत आहे, हे गोचर तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे.

विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. भग्योदय होईल, परदेश प्रवास होऊ शकतात. उत्तम लाभ होतील.

मित्र मंडळी वा ओळखीतून बरेच लाभ होऊ शकतात. कर्क राशीत राहू लाभत आहे, तो असे पर्यंत फायदा करून घ्या. शनि गोचर चतुर्थ स्थानी आहे आणि त्याची लाग्नावर दृस्टी आहे, वात रोग होऊ शकतो, तेलकट खाणे टाळावे.

पुढील वर्षी मार्च नंतर राहू दशमात आणि केतू चतुर्थ स्थानात प्रवेश करेल, नोकरी व्यवसायात उतार चढाव दोन्ही होतील, घरातले वातावरण संभाळावे, आजार होऊ शकतात.

तीर्थ यात्रा, गंगा स्नान घडायचे योग आहेत मात्र 2019 मार्च नंतर.

विद्यार्थी वर्गाला साधारण चांगला काळ आहे.

उपाय: हनुमान चालिसा चे रोज पाठ करावेत.

गुरू गोचर वृश्चिक 2018 तूळ राशी साठी

तुमच्या धन स्थानी गुरू चा प्रवेश होत आहे, हे वर्ष नोकरी व्यवसाय क्षेत्रात उत्तम बदल घडण्याचे आहे, प्रगती चा वेग वाढेल. झटपट यश मिळेल.

शनि, राहू आणि आता गुरू सगळ्या ग्रहांचे गोचर तुम्हाला तथास्तु म्हणत आहे.

मार्च 2019 पर्यंत उत्तम काळ आहे, राहू पुढे नव्या स्थानी प्रवेश करेल आणि भाग्यात अडचण होउ शकेल.

एखादे नवीन कार्य, नोकरी, व्यवसाय सुरू करायचा असल्यास उत्तम काळ आहे. जरूर लाभ घ्यावा.

अचानक धन लाभ पण संभवतो, वारसा हक्काने पण लाभ होऊ शकतात. राहू नव्या स्थानी गेल्यावर मात्र परिस्थिती बदलेल, उपासना मार्गात अडचणी येतील, वडिलांची तब्येत खराब होऊ शकते.

एकूणच तूळ राशी साठी हे वृश्चिक राशीत ले गोचर उत्तम असणार आहे. विद्यार्थी वर्गाला उत्तम काळ आहे, पूर्ण लाभ घ्यावा.

उपाय: शनि उपासना करा.

गुरू गोचर वृश्चिक 2018 वृश्चिक राशी साठी.

गुरू तुमच्या राशीत प्रवेश करीत आहे, साडेसाती चालू असताना गुरू चे हे गोचर थोडासा दिलासा देणारे ठरेल.

गुरू ची पंचम, नवम आणि सप्तं स्थानी दृस्टी असणार आहे, विवाह इच्छुकांचे विवाह होण्याचे योग आहेत.

संतती सौख्या साठी उत्तम काळ आहे, ज्यांना संतती नियोजन करायचे आहे त्यांच्या साठी उत्तम वेळ आहे.

ह्या वर्षी केलेली उपासना उत्तम फळ देईल, जास्तीत जास्त उपासना करा, पुण्य कार्य करा, केलेले उपाय फळ-तील.

गुरू हा पंचम आणि नवम दोन्ही महत्वाच्या स्थाना वर बघतोय, साडेसाती चा त्रास सौम्य व्हायला आत्ता उपाय करा, त्यात यश मिळेल.

राहू चे गोचर 2019 मार्च नंतर अष्टम स्थानी होणार आहे, केतू कुटुंब स्थानी शनि बरोबर असेल. घर परिवार बाबत चिंता लागून राहील, आर्थिक नुकसान संभवते, व्यवहार करताना सांभाळून करावे. डोळ्याचे आजार संभवतात, काळजी घ्यावी.

विद्यार्थी वर्गाला उत्तम काळ आहे, अभ्यास जोरात करा, उत्तम यश मिळेल.

उपाय: गुरू ची उपासना करा.

गुरू गोचर वृश्चिक 2018 धनू राशी साठी.

गुरू तुमच्या 12व्या स्थानी प्रवेश करीत आहे. हे गोचर काही विशेष चांगले नाही तरी अध्यात्मिक क्षेत्रात असणार्‍यांना उत्तम असणार आहे.

तुमची शक्ति नको त्या कामात वाया जाणार नाही, ह्याची काळजी घ्यावी. आती काम करून स्वताहाला आजारी पडून घ्याल.

स्वताहाला नको तिकडे खर्च करत बसू नका. परदेश प्रवास करायला गोचर उत्तम आहे, चांगल्या गोष्टीन मधे खर्च कराल, सत्कर्म कराल, नवीन जागी जायचे योग आहेत, एखादे घर किव्हा जमीन विकत घेऊ शकता.

सध्या घर परिवारात चाललेली कटकट हळू हळू कमी होईल, मंगळ कुंभ राशीत नवेंबर 2018 ला प्रवेश करताच घरातली कट कट कमी होईल.

रागावर नियंत्रण ठेवा, डोळ्याला इजा होऊ शकते, सांभाळा. पैसा बराच खर्च होईल, आर्थिक नियोजन करा.

नवीन गूढ विद्या शिकायला चांगली वेळ आहे, नोकरीत असणार्‍यांना चांगली वेळ आहे, प्रमोशन मिळू शकेल पण त्याच बरोबर खूप काम ही करावे लागेल. प्रकृती जपावी.

विद्यार्थी वर्गाला मेहनत घ्यावी लागेल, ह्या वर्षी गोचर विशेष चांगली नाही.

उपाय: रोज 7 वेळा हनुमान चालिसा पाठ करा आणि दशरथ कृत शनि स्तोत्र वाचा.

गुरू गोचर वृश्चिक 2018 मकर राशी साठी.

गुरू तुमच्या लाभ स्थानात प्रवेश करीत आहे. तुमचा राशी स्वामी शनि 12व्या स्थानी असल्या मुळे तुम्हाला साडे-सती सुरू आहे, नको तिकडे आपण आपली शक्ति वाया घालावत आहात. हवे तसे काही होत नाहीए, गुरू गोचर चांगले असल्या मुळे लाभ होतील. वावैहिक आयुष्यात ल्या कटकटी कमी व्हायला मदत होईल, स्वताहावर नियंत्रण ठेवायला शिका.

ज्यांचे विवाह जुळत नाहीयेत अश्यांना ह्या वर्षी विवाह योग आहेत, गोचर राहू मार्च 2019 मधे सप्त्म स्थान सोडून 6व्या स्थानी जाईल तेव्हा विवाह योग जास्त चांगले जुळून येतील.

संतती नियोजना साठी उत्तम वेळ आहे, विद्यार्थी वर्गाला ही उत्तम वेळ आहे, जास्तीत जास्त अभ्यास करावा, गुरू गोचर चा फायदा करून घ्यावा.

लहान प्रवास यशस्वी होतील, प्रवासातून ओळखी होऊन फायदा होईल, शेजारी, भावंड ह्यांच्याकडून फायदा होईल. संबंध चांगले राहतील.

राहू 6व्या स्थानी गेला की कोर्ट कचेर्या होऊ शकतात, नको तिकडे आपला वेळ वा पैसा वाया घलवू नका, उगाच कोणत्याही वादात पडू नका.

उपाय: 7 वेळा हनुमान चालिसा रोज म्हणा. शनि ला तिळाचे तेल अर्पण करा. शनिवारी शनि मंदिरात तिळाचे तेलाचा दिवा लावा.

गुरू गोचर वृश्चिक 2018 कुंभ राशी साठी

गुरू तुमच्या 10व्या स्थानी प्रवेश करीत आहे. शनि लाभत वा गुरू दशमात असा उत्तम योग जुळून आलेला आहे, जे मागाल ते मिळेल, असा योग जुळून आलेला आहे. पुरेपूर फायदा घ्या, नोकरी व्यवसायात उत्तम प्रगती होईल, ह्या वर्षी उत्तम संधी चालत येतील, लाभतील.

राहू चे गोचर ही तुम्हाला मार्च 2019 पर्यंत उत्तम आहे, शत्रू नाश पावतील, कोणी तुमचे वाकडे करू शकणार नाही.

नवीन घर, गाडी घायला उत्तम काळ आहे, कोर्ट कॅचेरी च्या कामात यश मिळेल, स्पर्धा परीक्षान मधे यश मिळेल.

आर्थिक बाबतीत उत्तम काळ आहे, चांगले नियोजन करून ठेवा, परिवारा बरोबर वेळ घालवा, परिवारा मधे नवीन व्यक्ती येण्याच्यी शक्यता आहे.

एकूण आनंद देणारे गोचर आहे, विद्यार्थी वर्गाला ही उत्तम वेळ आहे. मार्च 2019 पर्यंत उत्तम यश मिळेल, मग अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे लागणार. राहू पंचमात गेला की नको त्या गोष्टीन मधे लक्ष लागेल.

उपाय: रोज विष्णू सहस्रनाम म्हणा.

गुरू गोचर वृश्चिक 2018 मीन राशी साठी

गुरू तुमच्या नवम स्थानी प्रवेश करीत आहे. तुमच्या राशी वर आणि पंचम भावा वर त्याची दृस्टी शुभ आहे.

लहान प्रवास यशस्वी होतील, नवीन ओळखीतून फायदा होईल, आरोग्य सुधारेल, हातून चांगले लिखाण होईल. कल्पना शक्ति उत्तम होईल आणि चांगल्या गोष्टी सुचतील.

लेखन आणि कला क्षेत्रात असलेल्यांना उत्तम वेळ आहे, बरेच प्रवास होतील आणि चांगली कामे मिळतील.

संतती सौख्या साठी उत्तम काळ आहे, ज्यांना संतती नियोजन करायचे आहे अश्यांसाठी उत्तम काळ आहे. पुढील वर्षी संतती सुख लाभेल.

मागचे वर्षी बरेच त्रास सहन करावे लागले, ह्या वर्षी बर्‍याच गोष्टी मार्गी लागतील, तब्येत उत्तम राहण्यास मदत होईल, आहार चांगला घ्या.

विद्यार्थी वर्गाला उत्तम काळ आहे, कल्पना शक्ति चा उत्तम उपयोग होईल, कला क्षेत्रात ल्या लोकांना खूप चांगले यश मिळेल.

जास्तीत जास्त उपासना करा, उत्तम फळ मिळेल, गुरू सेवा करा. हे वर्ष आपल्या यशाची पहिली पायरी आहे असा समजा.

उपाय: गुरू ची उपासना करा, तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घ्या.

astrologerashish
astrologerashish
Astrologer Ashish Desai is a young and dynamic astrologer having experience of more than 20 years in astrology, but professionally he has been doing this since 2012. He started learning astrology from his mother at a very tender age, he is an accounting and finance graduate from Mumbai university and also holds a diploma in fashion photography. He has many satisfied clients from all over the world and people from more than 30 countries consult him at present. Though he provides consultation to people from all walks of life but majority of his clients come from business families, corporate world, politics, cinema. He specializes in Horoscope match making, C-section Muhurat, Career astrology, business astrology, child/infertility issues, Medical astrology, financial astrology and all types of muhurta and remedial astrology. He believes that astrology can reveal your true potential and help you to achieve success and wealth in your life.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.